दिल्ली पोलिसांचा सैतानी चेहरा; रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोचावर हल्ला
नवी दिल्ली, 01 - नेहमी आपल्या गलथानपणाने चर्चेत राहणार्या दिल्ली पोलिसांचा सैतानी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी जनावराप्रणाणे मारले आहे.
पोलिसांच्या कर्तृत्त्वाची हद्द म्हणजे त्यांनी आंदोलक तरुणींचे केस उपटून त्यांना बेदम मारहाण केली.
30 जानेवारीला रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ दिल्लीत मोर्चा काढण्यात आला. ‘आईसा’ या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेने दिल्लीच्या संघ कार्यालयावर हा मोर्चा काढला होता. मात्र मध्येच पोलिसांनी हा मोर्चा अडवला आणि त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अक्षरश: जनावरांप्रमाणे मारहाण केली.