लोखंडी गेट अंगावर पडून दोन शाळकरी मुले ठार
परभणी, दि. 15 - परभणीतील मानवत येथे कॉलेजचे लोखंडी गेट अंगावर पडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मानवत येथील के. के. एम महाविद्यालयाचे गेट दोन शाळकरी मुलांच्या अंगावर पडले आणि ते गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. तन्मय रामकिशन फन्ड (वय 7)आणि गोविंद मुंजाभाऊ फन्ड (वय 10) अशी मृत मुलांची नावे आहेत.