आखाडयांवर दरोडा, तिघांची हत्या
परभणी, दि. 3 - मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दोन आखाड्यांवर दरोडा टाकण्यात आला. पहिल्या आखाड्यावर दरोडेखोरांनी सुभाष ज्ञानदेव पठाडे (52), शांताबाई सुभाष पठाडे (48) यांच्यावर कुर्हाडीचे घाव घालून त्यांचा खून केला.
त्यानंतर बाजूच्या आखाड्यावर जाऊन भाऊराव राजाराम फुलपगार (60 ) यांच्याकडे पैशाची मागणी केली. फुलपगार यांनी विरोध करताच त्यांच्यावर कुर्हाडीचे घाव घालून त्यांचाही खून करून दरोडेखोर निघून गेले. दरोडेखोरांच्या मारहाणीत अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.