खंडाळ्यातील युवकाची आत्महत्या अनैतिक संबंधातून
सातारा, 14 - अनैतिक संबंधातून पैसे घेऊन वारंवार शारीरिक व मानसिक छळ करत असल्याच्या कारणावरुन संदीप राजेंद्र आवाडे (वय 24, रा. खंडाळा) या युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची माहिती खंडाळा पोलिसांनी दिली.
मयत संदीप आवाडे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये संशयित आरोपी जावळे हिच्याशी त्याचे अनैतिक संबंध होते. त्यातून उसने दिलेले पैसे वारंवार मागत असल्याने संशयित आरोपी शारीरिक व मानसिक त्रास देऊन तू जीव दे, असे सांगत होती. त्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले होते. संदीप आवाडे याने विषारी औषध घेतल्यानंतर त्याला खंडाळा येथे उपचार करुन पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. याप्रकरणी सारिका संतोष जावळे, संतोष सुदाम जावळे, रामदास दादा जावळे व संतोषचा साडू सागर (सर्व रा. हरळी, ता. खंडाळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश जावीर करत आहे.