Breaking News

शाहरुख खानच्या गाडीवर अहमदाबादमध्ये दगडफेक

अहमदाबाद, 14 - गुजरातच्या अहमदाबादमध्ये ’रईस’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने शाहरुख शूटिंगसाठी गुजरातच्या विविध भागात जातो. शूटिंगसाठी शाहरुख सरखेज रोजा येथे गेला होता. यावेळी काही लोकांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केली.  
दरम्यान, शाहरुख त्यावेळी गाडीत नव्हता. दगडफेक करणार्‍या व्यक्तींनी यावेळी शाहरुखविरोधात घोषणाबाजीही केली. याआधीही रईसच्या शूटिंगसाठी गुजरातच्या भुजमध्ये गेलेल्या शाहरुखला विरोधाचा सामना करावा लागला होता. 3 फेब्रुवारीला भुजच्या खारी नदीच्या किनार्‍यावर शूटिंग होणार होती मात्र ती रद्द करण्यात आली.