Breaking News

अमेरिकेकडून पाकिस्तानला लढाऊ विमाने, ओबामा प्रशासनाने दिली मंजुरी ; भारताकडून निषेध

वॉशिंग्टन, 13 -  अमेरिकी प्रशासनाच्या पाकिस्तानला ऋ-16 ही लढाऊ विमाने विकण्याच्या निर्णयाचा भारताने तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेतील लॉकहीड मार्टीन या कंपनीने पाकिस्तानबरोर केलेल्या या व्यवहाराला ओबामा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. हा खरेदी करार 699 मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे साडेचार हजार कोटींचा आहे. 
अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने काल या व्यवहाराला मंजुरी दिल्याची माहिती अमेरिकी काँग्रेसला म्हणजे संसदेला कळवली. पाकिस्तानला अमेरिकेकडून ऋ-16 विमाने मिळणार असल्यामुळे पाकिस्तानची संरक्षण सज्जतेत मोठी भर पडणार आहे. अमेरिकी सरकारचा निर्णय समजल्यावर भारत सरकारने या निर्णयावर टीका केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी भारत सरकारचा निषेध ट्विटरवर टाकला आहे.