Breaking News

पुण्यातील लष्करी तळाची 2009 मध्य दोनदा पाहणी केली : हेडली

मुंबई, 13 - 26/11 हल्ला प्रकरणी सुरु असलेल्या साक्षीचा आजचा पाचवा दिवस. डेव्हिड कोलमन हेडलीने आणखी धक्कादायक माहिती दिली.  
पुण्याच्या लष्करी तळाची 16 आणि 17 मार्च 2009 मध्ये मी पाहणी केली होती, अशी माहिती हेडलीने दिली.
ही पाहणी करताना मी त्यावेळी सूर्या व्हिला हॉटेलमध्ये आपण उतरलो होतो, अशी साक्ष हेडलीने मुंबई न्यायालयासमोर दिली आहे. पुणे शहरात फिरून अनेक ठिकाणचे व्हीडिओ शूटींग आपण केले होते आणि ज्यूंच्या छाबड हाऊसचेही चित्रिकरण केले होते, असे हेडलीने सांगितले. पुण्यातील लष्करी तळ म्हणजे भारतीय लष्कराचे दक्षिणेकडील मुख्यालय आहे. या लष्करी तळामध्ये शिरकाव करून लष्करातल्या काही जणांना एजंट म्हणून नेमण्याची आणि गुप्त माहिती फोडण्याचा प्रयत्न करण्याची सूचना मेजर इक्बालने आपल्याला दिली होती, असे हेडलीने म्हटले. दरम्यान, मुंबईवरील हदशतवादी हल्ल्यानंतर शिकागोमध्ये डॉ. तहव्वूर राणाला भेटलो.