दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या गाडीला अपघात
तेलंगणा, 15 - दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रणिता सुभाषच्या गाडीला रविवारी तेलंगणाच्या नलगोंडा येथे अपघात झाला. यात अपघातात तिला किरकोळ जखम झाली.
प्रणिता, तिची आई आणि अन्य चार जण हैदराबाद येथे जात होते. यावेळी सूर्यापेट-खम्माम रोडवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. या अपघातात प्रणिता तसेच इतर व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यात.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमींना सूर्यापेटमधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रणिताही अपघातानंतर हैदराबादसाठी रवाना झाली. तिने ट्विटरवरुन अपघाताची माहिती दिली. तसेच अपघाताचे फोटोही शेअर केले. माझी प्रकृती ठीक आहे.