Breaking News

नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे निधन

काठमांडू, 09 - नेपाऴचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे सोमवारी रात्री 12.50 वाजता निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. बुधवारी सकाळी कोईराला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
कोईराला गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते. निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान अतुल कोईरालासह नेपाळी काँग्रेसचे अनेक नेते त्याच्या राहात्या घरी पोहोचले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुशील कोईराला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताने एक सच्चा मित्र गमावला असल्याचे मोदींनी म्हटले आहे. मोदींनी ’ट्विटर’वरून कोईराला यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेपाळी काँग्रेसने सध्या पक्षाची आम सभा रद्द केली आहे. कोइराला 10 फेब्रुवारी 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. बांके लोकसभा मतदार संघातून कोईराला निवडून आले होते. चितवन लोकसभा मतदार संघातून कोईराला दुसर्यांदा 19 नोव्हेंबर 2013 मध्ये विजयी ठरले होते.