सत्ताधीशांची संपत्ती थक्क करणारी : देवेंद्र फडणवीस
पालघर, 09 - ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांची संपत्ती थक्क करणारी आहे. अजून अनेकांचा खुलासा होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीतील भ्रष्ट मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. पालघर पोटनिवडणुकीतील युतीचे उमेदवार अमित घोडांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली.
काही बाहेर आहेत ते देखील आता जास्त बाहेर राहणार नाहीत, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे न घेता मुख्यमंत्र्यांना इशारा दिला. आमचा कुणाबद्दलही राजकीय आकस नाही. मात्र, जनतेच्या तिजोरीतून लुटलेला पैसा परत जनतेच्या तिजोरीत टाकू, असे ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नारायण राणेंवरही चौफेर प्रहार केला. नाव न घेता त्यांना कोकणातले दलाल असे म्हटले. मश्चिमारांचा पर्शिननेटचा प्रश्न हा दहा वर्ष तसाच ठेवला त्यामुळे मत्स दुष्काळाची परिस्थिती मच्छिमार बांधवांवर आली आहे. 12 नॉटीकल माईलपर्यंत पर्शिननेट बोटींना बंदीच्या फाईलवर सहीच केली नाही. सरकारमध्ये पर्शिननेटचे दलाल होते.