राहुल द्रविडच्या पहिल्या परीक्षेचा लेखाजोखा
मुंबई, 17 - कोच म्हणून द्रविडची ही पहिली मोठी परीक्षा होती. भारताच्या या महान फलंदाजाच्या सहवासात युवा खेळाडूंना काय शिकायला मिळाले, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.
ईशान किशनच्या टीमने अंडर-19 विश्वचषक जिंकण्याची संधी गमावली. पण बांगलादेशात झालेली ही स्पर्धा भारताच्या युवा शिलेदारांना खूप काही शिकवून गेली. अंडर-19 टीमच्या या सदस्यांसाठी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन सर्वात महत्त्वाचे ठरले. त्याच्या सहवासात खेळताना युवा खेळाडूंनाही नवे स्फुरण चढले. द्रविडन या टीमला फक्त खेळाचेच धडे दिलेले नाहीत, तर आणखीही खूप काही दिले. पराभव कसा पचवायचा, त्यापासून कसा धडा घ्यायचा, हे या टीमला राहुल सरांनी शिकवले.