Breaking News

मुंबईत 70 डान्सबारना परवानगी

मुंबई, दि. 17 - गृहखात्याकडे डान्सबार सुरु करण्याच्या परवान्यासाठी 100 अर्ज आले होते. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवताना डान्सबारसाठी काही निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने डान्सबारचा परवाना मिळवण्यासाठी 26 अटी घातल्या आहेत.  
 डान्सबारना तुम्ही सरसकट बंदी करू शकत नाही. मात्र, तेथे काम करणार्‍या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अटी मात्र जरूर घालू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविताना स्पष्ट केले होते. त्यामुळे डान्सबारच्या परवान्यासाठी 26 अटी घातल्या आहेत. या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच अंतिम परवानगी दिली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार 100 पैकी 26 फेटाळण्यात आले तर, चार अर्जांवर अद्यापही निर्णय झालेला नाही. 
 अर्जदाराने तो या अटींच्या पूर्ततेस सक्षम आहे का, याचा स्वत: आढावा घेऊन, तसे लेखी देणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही निरीक्षकामार्फत लेखा परीक्षण करून संबंधितास परवाना मिळेल.अर्ज नामंजूर होण्याची वेगवेगळी कारणे आहेत.