जलयुक्त शिवार’ योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर आमीर खान
मुंबई, 17 - ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या उद्घाटनाला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहभोजन दिले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई दाखवत पंतप्रधानांच्या उपस्थितीत आमीरला राज्याच्या जलयुक्त शिवार योजनेचा ब्रॅड अॅम्बेसेडर बनण्याची विनंती केली होती.
आमीरनेही मुख्यमंत्र्यांची विनंत लगेच मान्य केल्याचीह माहिती मिळते आहे. जलयुक्त शिवार योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आमिरची घोषणा झाल्यानंतर जलयुक्त शिवाराची कामे सुरु असलेल्या ठिकाणी तो भेटी देईल. तेथील शेतकर्यांशी चर्चा करुन योजनेचा प्रचारही करेल. शिवाय, दृकश्राव्य आणि मृद्रित माध्यमांद्वारे या योजनेचा प्रचार करण्यासाठी आमीर पुढाकार घेईल. महानायक अमिताभ बच्चन हे राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. ‘मेक इन महाराष्ट्र’साठी उद्योग विभागाने तयार केलेल्या चित्रफितीमध्ये
अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी योगदान दिले आहे. आता जलयुक्त शिवार योजनेसाठी आमीर खान काम करणार आहे.