राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेत सायली काळे प्रथम
लोणार (प्रतिनिधी)। 15 - महाराष्ट्र सायकलींग अशोसिएशन व सायकल अशोसिएशन बुलडाणा यांच्यावतीने पहिल्या राज्यस्तरीय रोडरेस सायकलींग स्पर्धेचे आयोजन बुलडाणा अजिंठा रस्त्यावर करण्यात आले होते. 19 वर्षाखालील मुले,मुली, 17 वर्षाखालील मुले,मुली, 14 वर्षाखालील मुले,मुली, अश्या तीन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्रातील सायकलींगचे खेळाडु यास्पर्धेत सामिल झाले होते. यास्पर्धेचा बुलडाण्यातील क्रीडा प्रेमींनी आनंद घेतला
शनिवारी येथे पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तर रोडरेस सायकलींग अजिंक्यपद स्पर्धेत अमरावतीच्या सायली काळे, ठाण्याच्या परमिता केदार, औरंगाबादच्या श्राव्या यादव, रायगडच्या राज दाईतकर, तर अमरावतीचा जनमेजय मुगल यांनी विविध गटात अजिंक्यपद पटकाविले. त्यांची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 13 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय रोडरेस सायकलींग स्पर्धेत 14 वर्षे मुलींच्या वयोगटात परमिता केदार (ठाणे) हिने 7 किलो मीटरचे सायकल रेस पूर्ण करून प्रथम क्रमांक प्राप्त केला व सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. प्रांजली श्रीनाथ, (अमरावती) द्वितीय क्रमांक, वैष्णवी सोनुने (अमरावती) तृतीय क्रमांक, निकिता धाने (सातारा) चतुर्थ तर फाल्गुनी डोळस (ठाणे) हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला. मुलांमध्ये जनमेजय मुगल याने सुवर्ण पदक पटकाविले, तर सारथ देशमुख (ठाणे) द्वितीय, शिवम आवळे (सातारा) तृतीय, तर नकुल पालकर (औरंगाबाद), ईशांत बिजवे (अमरावती), हरीश चोपडे, शिवराज सपकाळ, कार्तिक नागपुरे (बुलडाणा), हृषिकेश जाधव (सातारा) यांनी विजय संपादन केला. सब ज्युनिअर मुलींच्या 20 किलो मीटर सायकल रेसमध्ये श्राव्या यादव ही सुवर्ण पदकाची मानकरी ठरली, तर मेघा भारती, अर्चना इंगळे (अकोला), अश्विनी उबरहंडे, सीमा सपकाळ, दीक्षा धुरंधर (बुलडाणा) यांनी विजय संपादन केला. मुलांमध्ये राज दीपक दाईतकर (रायगड) याने सुवर्ण पदक पटकावून प्रथम क्रमांक प्राप्त केला. अनिकेत पारकर (औरंगाबाद) द्वितीय क्रमांक, ओमकार साळुंके (रायगड) तृतीय क्रमांक तर तेजस शिलधनकर (रायगड), प्रवीण गायकवाड (औरंगाबाद), विनायक शिवदास (ठाणे), वैभव नाईक (रायगड) यांनी विजय संपादन केला. ज्युनिअर मुलींच्या गटात सायली काळे (अमरावती) हिने सुवर्ण पदक पटकाविले. द्वितीय क्रमांक रावीजोग तर तृतीय क्रमांक विपशना शिरसाट (अकोला) यांनी प्राप्त केला. भाग्यश्री शिंदे (अकोला), प्रज्ञा पवार (सातारा), पूजा ढाले (बुलडाणा) यांनी विजय संपादन केला, तर मुलांच्या ज्युनिअर गटात ओमकार उदय मोरे (रायगड) हिने सुवर्ण पदक पटकाविले. राहुल दाईतकर द्वितीय क्रमांक, दीपक सुधाकर जाधव (बुलडाणा) तृतीय क्रमांक तर सुरेश तायडे (अकोला), दादासाहेब ठोंबरे , ओमकार डवले (औरंगाबाद), शुभम इधरे (औरंगाबाद), आकाश दाभाडे, आकाश मते (वाशिम) यांनी यश प्राप्त केले. देशमुख मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, सायकलींग असोसिएशनचे राज्य सचिव सूर्यकांत पवार, जागतिक सायकल साहसी खेळाडू संजय मयुरे, आंतरराष्ट्रीय रस्सीखेच खेळाडू श्रीराम निळे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील देशमुख यांच्या हस्ते खेळाडूंना पदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संचालन सायकल असोसिएशनचे सहसचिव रवींद्र गणोशे यांनी, तर आभार नीलेश इंगळे यांनी मानले.