Breaking News

अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवली शहर देशात पहिले !

नवी दिल्ली, 15 - देशातील स्वच्छ आणि अस्वच्छ शहरांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्र खूपच तळाला आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड नवव्या, तर मुंबई दहाव्या स्थानावर आहे. तर अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवली शहर देशात पहिले आहे. 
स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या क्रमाकांचा मान कर्नाटकातील म्हैसूर शहराला मिळाला आहे. या यादीत पंजाब,हरियाणामधील चंदीगड दुसर्‍या तर तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली हे तिसर्‍या क्रमांकावर आहे. केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. टॉप 10 स्वच्छ शहरे - म्हैसूर - कर्नाटक, चंदीगड  - पंजाब, हरियाणा, तिरुचिरापल्ली - तामिळनाडू,  नवी दिल्ली, विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश,  सुरत - गुजरात,  राजकोट - गुजरात, गंगटोक - सिक्कीम, पिंपरी चिंचवड - महाराष्ट्र,  मुंबई - महाराष्ट्र.