Breaking News

ड्रायव्हरचा हार्ट अटॅकने मृत्यू, झाडावर बस आदळून 30 जखमी

कोल्हापूर, 15 - बस चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मीरज-गणपतीपुळे एसटीचा अपघात झाला. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, चालकाचा हृदयविकाराचा झटका आल्याने बसमध्येच मृत्यू झाला.  
अपघातात चालक बाबुराव सावंत यांचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गाडी चालवत असताना सावंत यांना ह्रदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याच्या तोंडातून फेस यायला लागल्याने त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस झाडाला जाऊन आदळली. अपघातातील जखमींवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पण या अपघातामुळे एसटी कर्मचार्‍यांचा कामावारच्या ताणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.