’बुलेट ट्रेन’मध्ये भारतीय रेल्वे 9,800 कोटी गुंतवणार
नवी दिल्ली, 15 - मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतीय रेल्वे मंत्रालय तब्बल 9,800 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. सुमारे 300 - 350 प्रति तास धावणार्या या ट्रेनसाठी जपान इनव्हेस्टमेंट एजन्सी अर्थसाहाय्य करणार आहे. या प्रकल्पाचे काम 2018 मध्ये सुरु करण्यात येणार असून पाच वर्षांत पूर्ण केले जाईल.
यासंदर्भात रेल्वे मंडळाचे चेअरमन ए. के. मित्तल यांनी सांगितले, की या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणार्या एकूण खर्चापैकी 81 टक्के वाटा जिका उचलणार आहे. त्यासाठी 98,000 हजार कोटी रुपये सॉफ्टलोन स्वरुपात मिळणार आहे. 50 वर्षांमध्ये या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. त्यावर केवळ 0.1 टक्के या अत्यल्प दराने व्याज आकारले जाणार आहे. या ट्रेनसाठी लागणारे 20 टक्के सुटे भाग जपानमधून आयात केले जातील.