पंतप्रधान मोदींसोबत आमीरचा ‘भोजनाचा’ कार्यक्रम
मुंबई, 14 - महाराष्ट्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उदघाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असल्याने रात्री भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अभिनेता आमीर खान आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनीही उपस्थिती लावली होती. तसेच, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आमीर खान गेल्या वर्षी चर्चेत आला होता. त्यानंतर आमीरला अतिथी देवो भव या अभियानाच्या राजदूत पदावरून दूर करण्यात आले.