Breaking News

ईस्त्राइल तंत्रज्ञानाचा वापर करणार : पंकजा मुंडे

 औरंगाबाद/प्रतिनिधी । 13 - जलयुक्त शिवार कामामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार आहे. या पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून ईस्त्राइलचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान वापरण्याचा मनोदय गˆामविकास व जलसंधारण, रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद तालुक्यातील पाचोड (एकोड) येथे कॉन्सुलेट जनरल ऑॅफ ईस्त्राइल शिष्टमंडळासोबत श्रीमती मुंडे यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी केली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ईस्त्राइलचे कॉन्सलेट जनरल डेव्हीड अकोव्ह, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आदी उपस्थित होते. पाचोड येथे चित्ते नदीचे पात्र खोल व सरळ करण्यात आले.