Breaking News

जिल्हा नियोजनाच्या बैठकीत जि.प. सदस्य आक्रमक

 अहमदनगर । प्रतिनिधी । 02 - आगामी वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजन मधून जिल्हा परिषदेला मिळणार्‍या निधीत 33 कोटी रुपयांची कपात केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे सदस्य पालकमंत्र्यांच्या भुमिकेबाबत संतप्त झाले. त्यांनी पालकमंत्र्यांवर आगपाखंड केली बैठकीतून 
अनेकांनी नाराजी व्यक्त करुन सभागृह सोडले. 
पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी जिल्हा नियोजन समितीची नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पालकमंत्र्याचें कार्यकर्ते व जवळच्या पदाधिकार्‍यांना प्रवेश देण्यात आला मात्र, वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त करुन निषेध केला. नियोजन समितीच्या बैठकीनंतर घेण्यात येणार्‍या पालकमंत्र्याच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला. यासंदर्भातील सर्व व्हाटस्अ‍ॅप व फेसबुकावर पोस्ट टाकण्यात आल्या. 
दरम्यान, बैठक अर्ध्यावर सोडून आलेले माजी जि.प.उपाध्यक्ष झावरे यांनी पालकमंत्र्याच्या भुमिकेचा निषेध केला. पंचायत समिती व जिल्हापरिषद संपविण्याचा डाव या शासनाचा आहे. शासनाच्या नियमाची या बैठकीत पायमल्ली झाली आहे. यातून पंचायत राज व्यवस्था  खीळ-खीळी करण्याचा डाव या सरकारचा असल्याचा आरोप त्यांनी केला.