गोविंदाला 5 लाखांची भरपाई देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली, 10 - बॉलीवूड अभिनेता गोविंदाला चाहत्याच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी न्यायालयाने पाच लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोविंदा संतोष राय या चाहत्याची माफी मागण्यास तयार झाला आहे. न्यायालयाने गोविंदाला यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. मात्र, संतोष राय यांना ही भरपाई मान्य नसून गोविंदाने प्रथम मला भेटावे, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी अभिनेता गोविंदा याला चाहता संतोष रायची
माफी मागण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
2008 मध्ये ‘मनी है तो हनी है’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गोविंदाने संतोष राय यांच्या कानशीलात लगावली होती. अभिनेता होण्याच्या इच्छेने मुंबईत आलेल्या संतोष यांनी ‘त्या’ घटनेनंतर आपले आयुष्य उद्वस्त झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती.