सात दिवसानंतर 25 फुट बर्फाखाली जवान सुखरूप
नवी दिल्ली, 10 - सियाचीनमध्ये बर्फाच्या ढिगार्याखाली जवान जिवंत सापडला. तब्बल सात दिवस 25 फूट बर्फाच्या ढिगार्याखाली अडकूनही जवान सुरक्षित राहली. त्याला बाहेर काढण्यात यश आले.
सियाचीनमध्ये हिमस्स्खलन होऊन पंचवीस फूट बर्फाच्या ढिगार्याखाली दबलेल्या भारतीय लष्कराच्या काही जवानांपैकी एक जवान जिवंत अवस्थेत सापडलाय. लान्स नायक हनुमंतअप्पा कोप्पड असे या सैनिकाचे नाव आहे. सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली गरम तंबूत ठेवण्यात आले असून त्याला सकाळी आर.आर. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या ठिकाणाहून आतापर्यंच चार जवानांचे शव बाहेर काढण्यात आलेत. मात्र हनुमंतअप्पा आश्चर्यकारकरित्या जिवंत सापडल्याने आणखीन काही जवान जिवंत असल्याची आशा आहे. हिमस्खलन झालेल्या ठिकाणी तब्बल 25 फूट बर्फ कापून काढल्यानंतर हनुमंतअप्पा कोप्पड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले, तर याठिकाणी पाच जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी दिली होती.