Breaking News

मुंबईत 50 वर्षांपूर्वीच्या ट्राम रेल्वेचा ट्रॅक सापडला

मुंबई, 21 - मुंबईत 50 वर्षांपूर्वीच्या ट्राम रेल्वेचा ट्रॅक सापडला आहे. कुलाबा परिसरात रस्त्याच्या बाजूला खोदकाम सुरु असताना हा ट्रक आढळला. त्यामुळे सामान्यांच्या मनात कुतूहल वाढीला लागले आहे.  
ब्रिटीश काळात म्हणजे 1874 साली मुंबईत ट्रामसेवा सुरु झाली. 6 ते 8 घोडे ट्रामला ओढण्याचे काम करत. मुंबईत 900 घोडे ट्रामसेवेसाठी वापरले जायचे. 1907 मध्ये पहिल्यांदा विद्युत ट्राम सुरु झाली. 1920 डबलडेकर ट्राम आली. कोणे एके काळी 433 ट्राम 47 किलोमीटर धावायच्या. मात्र 1964 मध्ये ट्रामसेवा बंद करण्यात आली. सध्या खोदकाम थांबवण्यात आले आहे. याठिकाणी ट्रॅक काढावा की त्यावरच रस्त्याचे काम करावे, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे.