Breaking News

जवानांमुळे तुम्ही वाद घालायला जिवंत - महेंद्रसिग धोनी

मुंबई, 21 - जेएनयूमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर देशभरात वाद सुरु आहेत. या वादात गौतम गंभीर, विजेंदर सिंगनंतर आता महेंद्रसिग धोनीही उतरला.
त्याने ट्विटरद्वारे या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ’जवानांमुळे आपण आज हा वाद घालण्यासाठी जिवंत आहोत; तेव्हा त्यांचा आदर करा’ असे टि्वट त्याने केले आहे. दोन दिवसांपूर्वी बॉक्सर विजेंदर सिंग तसेच क्रिकेटपटू गौतम गंभीरने देशभरात सुरु असलेल्या वादावरुन चिंता व्यक्त केली होती. कुस्तीपटू योगेश्‍वर दत्तनेही जेएनयूच्या वादावर कविता केरुन ती फेसबूकवर टाकली होती.