महाराष्ट्राच्या महाविद्यालयांमध्ये 46 विद्यार्थी संघटनांचे नक्षलवादी कनेक्शन
नवी दिल्ली, 15 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील वाद सुरु असतानाच नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनांवर टाच आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने सुरु केल्याचे दिसते आहे. महाराष्ट्रातल्या अशा 46 विद्यार्थी संघटनांची यादी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याच्या गुप्तचर विभागाकडे सुपुर्द केली आहे.
महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या या संघटना असून त्यांचा नक्षलवादी संलग्न संस्थांशी संबंध थेट संबंध असल्याचा सरकारचा निष्कर्ष आहे. त्यामुळे जेएनयु विद्यापीठातील वातावरण पाहता आगामी काळात या संघटनांवर चांगलीच पाळत राहण्याची शक्यता आहे. तसेच काही संघटनांवर कारवाईची कुर्हाडही कोसळू शकते. शिवाय, नक्षलवादी चळवळ शहरांकडे वळू लागली असल्याचे आणि शहरांमधील तरुणांना चळवळीत ओढून घेण्याचे वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये काही घटनांवरुन समोर आले आहे.