‘व्हॅलेंटाइन डे’ पार्टीत तरुणीवर बलात्कार
पुणे, 15 - व्हॅलेंटाईन डे च्या पार्टीसाठी मित्रासोबत घरी आलेल्या तरुणाने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली. याप्रकरणी तरुणाला हडपसर पोलिसांनी गजाआड केले.
फिरोज महंमद शेख (वय 23 रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित तरुणी परराज्यातून पुण्यात आली आहे. तक्रारदार तरुणी आणि तिच्या तीन मैत्रिणींनी सदनिका भाडेतत्त्वावर घेतली आहे. काही दिवसांपूर्वी जीम प्रशिक्षकासोबत चौघींची ओळख झाली. व्हॅलेंटाईन डे च्या पार्टीसाठी त्यांनी जीम प्रशिक्षकाला शनिवारी रात्री घरी पार्टीसाठी बोलावले होते. जीम प्रशिक्षकासोबत त्याचा मित्र फिरोज शेख तेथे आला होता. मध्यरात्री फिरोज याने झोपेत असलेल्या तरुणीवर बलात्कार केला.