Breaking News

तांदुळ महोत्सवात 32 क्िंवटल तांदळाची विक्री

सातारा, 13 - ज्योतिर्मय मल्टी एक्सपो 2016 मध्ये कृषि विभाग सातारा यांचेमार्फत जिल्हा परिषद मैदान सातारा येथे तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 
या तांदूळ महोत्सवात जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, जावली, खंडाळा, महाबळेश्‍वर या तालुक्यातील 101 शेतकर्‍यांनी एकूण 251 क्िंवटल उत्पादीत केलेला इंद्रायणी, तामसाळ, बासमती, इंडम बासमती, इगतपुरी, बासमती 370 फुले समृद्धी व इतर स्थानिक वाणाचा तांदूळ विक्रीसाठी आणलेला आहे. आज एकूण 32 क्िंवटल तांदळाची विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी दिली. तांदूळ महोत्सवात तांदूळ विक्रीसाठी सहभागी होऊ इच्छिणार्‍या तांदूळ उत्पादक शेतकर्‍यांनी नांव नोंदणीसाठी नजीकच्या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडल कृषि अधिकारी किंवा तालूका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.