Breaking News

कुपवाडातील चकमकीत दोन जवान शहीद; चार जवान जखमी

श्रीनगर, 13 -  उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर, एका अधिका-यासह चार जवान जखमी झाले. मात्र, भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील मरसारी गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहिम सुरु केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले. या गोळीबारात जखमी झालेल्यांमध्ये एक लष्करी अधिकारीही आहे. जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चकमक बराच वेळ चालू असल्याने जवानांनी दहशतवाद्यांनी कब्जा केलेले घर स्फोटकाच्या साहाय्याने उडवून दिले. यात चारही दहशतवादी ठार झाले आहेत.