वन रँक व वन पेन्शनचे टेबल मंजूर बुलडाणा, 10 - बर्याच काळापासून प्रलंबित असलेला माजी सैनिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला वन रँक वन पेन्शनला केंद्र सरकारने मंजूरात दिली आहे. या पेन्शनचे टेबल रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेन्शन) अलाहाबाद यांनी दिलेले आहे. या मध्ये रेग्युलर आर्मी, नेव्ही व एअर फोर्सचे निवृत्त वेतन धारक, प्रादेशिक सेनेमधून निवृत्त वेतन धारक, रेग्युलर आर्मी व एअर फोर्सचे डिएससी तसेच अयोद्धा सैनिक यांची सेवा पेन्शन, अपंगत्व पेन्शन, ऑर्डीनरी व स्पेशल फॅमिली पेन्शन, लिबरलाईज्ड फॅमिली पेन्शन, युद्ध जखमी पेन्शन, डिपेन्डन्ट पेन्शन, इनव्हॅलिड पेन्शनचे टेबलचा समावेश आहे. सदरचे टेबल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या नोटीस फलकावर तसेच ... या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी आपआपली पेन्शन तपासून घ्यावी व स्वत:ला प्रशिक्षीत करून घ्यावे, असे आवाहन माजी सैनिक कल्याण अधिकारी मिलींदकुमार बडगे यांनी केले आहे.
बुलडाणा, 10 - बर्याच काळापासून प्रलंबित असलेला माजी सैनिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला वन रँक वन पेन्शनला केंद्र सरकारने मंजूरात दिली आहे. या पेन्शनचे टेबल रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेन्शन) अलाहाबाद यांनी दिलेले आहे. या मध्ये रेग्युलर आर्मी, नेव्ही व एअर फोर्सचे निवृत्त वेतन धारक, प्रादेशिक सेनेमधून निवृत्त वेतन धारक, रेग्युलर आर्मी व एअर फोर्सचे डिएससी तसेच अयोद्धा सैनिक यांची सेवा पेन्शन, अपंगत्व पेन्शन, ऑर्डीनरी व स्पेशल फॅमिली पेन्शन, लिबरलाईज्ड फॅमिली पेन्शन, युद्ध जखमी पेन्शन, डिपेन्डन्ट पेन्शन, इनव्हॅलिड पेन्शनचे टेबलचा समावेश आहे.
सदरचे टेबल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या नोटीस फलकावर तसेच ... या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी आपआपली पेन्शन तपासून घ्यावी व स्वत:ला प्रशिक्षीत करून घ्यावे, असे आवाहन माजी सैनिक कल्याण अधिकारी मिलींदकुमार बडगे यांनी केले आहे.