Breaking News

कायमस्वरुपी विना अनुदानीत तत्वावर नविन तुकड्यांसाठी अर्ज आमंत्रीत

बुलडाणा, 10 - सन 2016-17 या शैक्षणिक सत्रापासून कायमस्वरूपी विना अनुदान तत्वावर नविन अभ्यासक्रम/ नविन तुकड्या सुरू करण्यासाठी 15 मार्च 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम (इयत्ता 9 व 10) , उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, उच्च माध्यमिक स्तरावरील द्विलक्षी अभ्यासक्रम यासाठी नविन संस्था/ वाढीव तुकड्या सुरू करू इच्छिणार्‍या पंजीकृत व आवश्यक अटींची पुर्तता करणार्‍या शैक्षणिक संस्थांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.    अर्जाचा विहीत नमुना व माहिती पुस्तिका, इतर आवश्यक माहिती करीता जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.