Breaking News

धम्मगिरी येथील बुध्द विहार शौर्य दिन साजरा


 बुलडाणा (प्रतिनिधीे) । 04 -भिमा कोरेगाव येथील भिमा नदीच्या काठी शौर्य गाजविणार्‍या शुरविरांना मानवंदना देण्यासाठी  1 जानेवारी रोजी शहरातील धम्मगिरी बुध्दविहार येथे शौर्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या वतीने विजय स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदना देण्यात आली. 
कार्यक्रमाचे आयोजन दिपक मोरे, सुभाष खरे, शाहिर वा.का. दाभाडे व सुमेध गायकवाड  यांनी केलेे होतेे.  सर्वप्रथम पुज्य भंदत स्वरानंद यांनी उपस्थितांना त्रीशरण पंचशील दिले. त्यानंतर समता सैनिक दलासह मान्यवरांनी विजय स्तंभाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी दिकप मोरे यांनी  शौर्य गाथेचा इतिहास उलगडतांना ते म्हणाले की,  भिमा कारेगांव येथे झालेल्या युध्दात पेशव्यांचा दारुन पराभव इंग्रजांनी केला होता. यामध्ये त्यांना महार सैनिकांनी मोलाची मदत केली होती. पेशव्यांच्या हजारो सैन्याला मुठभर महार सैनिकांनी  पाणी पाजले होते. या युध्दात इंग्रजांचा अभूतपुर्व विजय झाला होता. म्हणून हा दिन शौर्य दिन म्हणून साजरा केल्या जातो. दि. 1 जानेवारी 1818 रोजी सकाळी 10 वाजेपासुन ते रात्री 9 वाजेपर्यंत दारुण पराभव झालेल्या लढाईत पेशव्यांचा खातमा केला. यामध्ये शुरवीरांच्या बटालियनचे  20 महाविर कामी आले.  3 महाविर जखमी झाले. शहिद झालेल्या क्रांतीकारकांची स्मृती अजरामर रहावी, 
म्हणुन या युध्दाची सुरुवात जेथे झाली, त्या भिमाकोरेगावच्या भिमा नदीच्या तिरावरती इंग्रजांनी भव्य दिव्य स्मृतीस्तंभ उभारला आहे. कार्यक्रमाला गणेश तायडे, जे.पी. वाकोडे, सुरेश तेलंग, राज्ाु सरकटे, समता सैनिक दलाचे सुभाष खरे, त्रंबक इंगळे, सिध्दार्थ गवई, गणेश भालेराव, विलास भालेराव, सचिन  खरे, मिलिंद जाधव, रासपचे गणेश सोनोने, विजय राऊत, सुमेध गायकवाड, माणिक निस्वादे, डि.एस. बोर्डे, टी.जी. इंगळे, रवींद्र बोर्डे, जनार्दन सरकटे, गजानन सुरडकर यांच्यासह शहर व परिसरातील माजी  सैनिक, समता सैनिक दल व युवकांनी मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते.