Breaking News

ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरूण टिकेकर यांचे निधन


मुंबई, 19 -  ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरूण टिकेकर यांचे आज अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. ते 71 वर्षांच होते. त्यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्र क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
टिकेकर हे गेल्या काही महिन्यांपासून श्‍वसनाच्या आजाराने त्रस्त होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. पत्रकारितेची मूल्य जपणारा विवेकी पत्रकार आणि भरपूर वाचन करणारा संपादक हरपल्याची भावना पत्रकारिता क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. लोकसत्ताचे संपादक म्हणून टिकेकर यांची कारकीर्द विशेष गाजली. लोकमत वृत्तपत्रातही त्यांनी काम केले. त्यांच्या स्तंभाचे शिर्षकही वैशिष्टयपूर्ण असायचे.
भ्रष्टाचारावर सडेतोड लेखन करणारे पत्रकार म्हणून ते प्रासिद्ध होते. युती शासनाच्या भ्रष्ट कारभारावरही त्यांनी आसूड ओढले होते. त्यावेळी त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आले होते. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी स्वतःहून पोलीस संरक्षण नाकारले. अग्रलेखांवर आधारीत ‘अस्वस्थ महाराष्ट्र’ हा त्यांचा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय अनेक विषयांवरील विविध पुस्तकांचे लेखन आणि संपादनही त्यांनी केले आहे. पत्रकारितेशिवाय अन्य क्षेत्रातही त्यांचा मोठा आवाका होता. टिकेकर यांनी इंग्रजीत मुंबई विद्यापीठाचा इतिहास लिहिला होता. त्यासाठी त्यांनी अनेक दुर्मिळ पुस्तकं गोळा के
ली होती. अलीकडे ते मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष होते.