Breaking News

सिक्कीम भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य


कोलकाता, 19 - सिक्कीम हे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य ठरले आहे. येथे सुमारे 75 हजार हेक्टर शेतजमिनीत सेंद्रीय शेती सुरू करण्यात आली आहे. सेंद्रीय शेती करताना कोणतीही रासायनिक खते, तसेच किटकनाशकं वापरली जात नाहीत, त्यामुळे शेती कमी खर्चात होते, उत्पन्न रासायनिक शेतीच्या मानाने कमी येत असले, तरी सेंद्रीय शेतीतील उत्पादनांमध्ये विषारी घटक नसल्याने, अन्न रूचकर लागते, तसेच अनेक आजार दूर राहतात.
‘डिसेंबरच्या अखेरीस आम्ही संपूर्ण सेंद्रिय हा दर्जा मिळविला आहे. गंगटोक येथे 18 जानेवारी रोजी सेंद्रीय शेतीविषयी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या या दर्जाची औपचारिक घोषणा करतील, असे सिक्कीम सेंद्रिय मोहिमेचे कार्यकारी संचालक डॉ. अनबल्गन यांनी सांगितले.