देशात पुरोगामी, परिवर्तनवादी विचारधारा रुजविण्याचे काम महाराष्ट्राने केले - कोकाटे
औरंगाबाद, 19 - देशात पुरोगामी, परिवर्तनवादी विचारधारा रुजविण्याचे काम महाराष्ट्राने केले, असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले. राज्यस्तरीय प्रेरणा नेतृत्वगु
ण व विकास शिबिरात श्री. कोकाटे बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिफार्ट सभागृहात सोमवारी त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कृषी-अकृषी-स्वायत्त 20 विद्यापीठांतील दीडशे स्वयंसेवक शिबिरात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे हे शिबिर होत आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके, संयोजक डॉ. राजेश करपे, आजीवन शिक्षण विभागाचे संचालक डॉ. किशन धाबे, डॉ. सुहास मोराळे, डॉ. चेतना सोनकांबळे उपस्थित होते. श्री. कोकाटे म्हणाले, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत लाभलेले नेतृत्व विधायकतेऐवजी विघातक विचारांची पेरणी करू लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. अलीकडे उपजत गुणवत्ता असणार्यांपेक्षाही लादलेले नेतृत्व आपल्याला स्वीकारावे लागत आहे. सामाजिक सेवेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण करणारी राष्ट्रीय सेवा योजना ही प्रयोगशाळा आहे,“ असे डॉ. साळुंके म्हणाले. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शरद गावंडे यांनी आभार मानले.
