’मस्तीजादे’च्या दृश्यांना कात्री नाही : सनी लियोन
मुंबई, 4 - अभिनेत्री सन्नी लियोन आगामी ’मस्तीजादे’ मध्ये दिसेल आणि तिच्या मते, चित्रपटातील दृश्यांत कोणतीही कपात केलेली नाही. सनीने आपला नवीन गेम सनी लियोन तीन पतीच्या घोषणेप्रसंगी सांगितले की, ही अफवा आहे की, चित्रपटात खूप दृश्य कापले आहेत. मात्र तुम्हाला चित्रपटात असे काही दिसणार नाही.’’ चित्रपटाबाबत सनी लियोनने सांगितले की, हा चित्रपट उत्सााहवर्धक, विनोदी आणि चकित करणारा आहे. सनी लियोन म्हणाली, सर्वांना वाटते की, चित्रपट चांगला वाईट किंवा विनोदी असू शकतो. कारण निर्मात्यांनी यासाठी चांगले काम केले आहे. मला विश्वास आहे की, हा चित्रपट तुम्हाला हसवेल आणि चकित करील.’’ मिलाप जवेरीद्वारा निर्मित हा चित्रपट येत्या 29 जानेवारीला प्रदर्शित होईल.