Breaking News

सलमानला तोड नाही : अरबाज खान


पणजी, 4-  पावर कपल’ या टेलिव्हीजन शोची यजमानी करत असलेला अभिनेता-निर्माता अरबाज खानच्या मते, शोच्या यजमानी संदर्भात त्याचा भाऊ सलमान खानला तोड नाही. सलमान सध्या ’बिग बॉस नौ’ची यजमानी करीत आहे. अरबाजला शोच्या यजमानीबाबत दोन्ही भावांत स्पर्धा असल्याचे विचारले असता तो म्हणाला, यात अजिबात स्पर्धा नाही. सलमान कुठे आणि मी कुठे. खरे सांगायचे तर ही स्पर्धा नाही.’ सोनी एंटरटेनमेंट टेलीविजनच्या ’पावर कपल’ या शोमध्ये अरबाज आपली पत्नी मलाइका अरोत्रडासोबत यजमानी करताना दिसतो. मलाइका म्हणाली, अरबाजने एक यजमान म्हणून चांगले काम केले तर सलमानला खूप आनंद होईल.