Breaking News

भारतीय लष्करामधील अधिकारी व जवानांस इशारा

चंडीगड, 4 - भारतीय लष्करामधील अधिकारी व जवान; आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या सोशल मिडियाच्या वापरासंदर्भात लष्करातर्फे मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. फेसबुकवर अश्‍लील छायाचित्रे वा व्हिडिओ न पाहण्याचे; तसेच अज्ञात लोकांकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट‘ न स्वीकारण्याचे निर्देश या नियमावलीद्वारे देण्यात आले आहेत. 
फेसबुकवरील एखादे अश्‍लील छायाचित्र हे लष्कराची संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी तयार करण्यात आलेला सापळा असू शकतो, असा इशारा या नियमावलीद्वारे देण्यात आला आहे. हवाई दलामधील जवान (एअरमन) रणजित के के याला गेल्या आठवड्यात फेसबुकवर सुंदर छायाचित्र असलेल्या एका महिलेस भारतामधील हवाई तळांची संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपांतर्गत ताब्यात घेण्यात आली आहे. रणजित याला ब्रिटनमधील पत्रकार वाटलेली ही महिला प्रत्यक्षामध्ये एका परकीय गुप्तहेर खात्याशी संबंधित होती. या पार्श्‍वभूमीवर लष्कराने ही नियमावली प्रसिद्ध केली आहे.
1. सोशल मिडियावर अश्‍लील संकेतस्थळे, छायाचित्रे पाहु नये, सोशल मिडियावर लष्कराच्या गणवेशामधील छायाचित्रे प्रसिद्ध करु नये, बक्षिसाची लालुच दाखविणार्‍या जाहिरातींच्या संकेतस्थळांस भेट देऊ नये, लष्करामधील औपचारिक ओळख जाहीर करु नये, शस्त्रासहित छायाचित्र प्रसिद्ध करु नये, लष्करामधील हुद्दा, विभाग वा सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणाची माहिती उघड करु नये, अज्ञातांच्या फ्रेंड रिक्वेस्ट्स स्वीकारु नये, लष्करामधील जवानांच्या आप्तस्वकीयांनी त्यांच्यासंदर्भातील माहिती सोशल मिडियावर प्रसिद्ध करु नये, लष्कराशी संबंधित कोणतेही छायाचित्र प्रसिद्ध करु नये,
, संगणक वा लॅपटॉपवर लष्कराशी संबंधित कोणतीही माहिती साठवून ठेवू नये.