Breaking News

कलावंत विचार मंचच्या वतीने पुरस्कार वितरण

 नाशिक/प्रतिनिधी। 10 - कलावंत विचारमंचच्यावतीने लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहीर 
अमर शेख यांची जयंती, कवयत्री बहिणाबाई चौधरी स्मृतीदिनानिमित्त पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक 
भवन इंद्रकुंड, पंचवटी येथे कलावंत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्याध्यक्ष सुनिल मोंढे यांनी केले. यावेळी कोर्ट सिनेमाचे अभिनेते विरा साथीदार यांच्या हस्ते बालशाहीर शिवराज भोर, लेखक चंद्रकांत ढासे, बाल अभिनेत्री आनीशा देशमुख, गायिका कोमल सावंत,चित्रपट कलावंत प्रकाश खडांगळे, शिवशाहीर मुकुंद भोर, शाहीर विलास आटक, बालशाहीर विकास महाजन, नाट्यकलावंत राजेंद्र माळी, शाहीर सिध्दार्थ सावंत, शाहिर डॉ. भारत कारिया, सिनेकलावंत स्वप्नील रणखांबे, नाट्य कलावंत ताराचंद मोतमल, लेखक राकेश वानखेडे, शिवकार्य मोहिमेचे संकेत नेवकर, बजरंग जेलगुडे, कवियत्री मंगल रोकडे, बालनाट्य होळी, बालनाट्य माती माती टिकतील आपली नाती आदिंना कलावंत पुरस्कार देण्यात आले. यावेळी वसंत बंदावणे (लिनीअर फिल्मस् निर्माते), शिवदास म्हसदे ( अध्यक्ष मानवतावादी बहुउद्देशिय संस्था) अ‍ॅड. बाबासाहेब नन्नावरे (अध्यक्ष वकील विचारमंच) रूपचंद चंद्रमोरे, मोहन अढांगळे आदि उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. चारूदत्त म्हसदे यांनी केले. आभार प्रदर्शन वैशाली देव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय जाधव, हेमंत धस, अरविंद भालेकर, अक्षय जाधव, मयुर गांगुर्डे यांनी विशेष प्रयत्न केले.