मनसेची जम्बो कार्यकारिणी जाहीर
नाशिक/प्रतिनिधी। 10 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 91 कार्यकर्त्यांचा समावेश असलेली जम्बो शहर
कार्यकारिणी संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी शुक्रवारी घोषित केली. नूतन पदाधिकार्यांना पक्षशिस्त
आणि जबाबदारीचे भान ठेवण्याचा सल्ला देतानाच नकारात्मक विचार टाळण्याचे आवाहन अभ्यंकर यांनी केले आहे.
मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली 91 जणांची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात प्रवक्तेपदी संदीप लेनकर कायम असून निरीक्षक म्हणून पूर्व विधानसभेसाठी किशोर जाचक, मध्य विधानसभेसाठी सचिन भोसले आणि पश्चिम विधानसभेसाठी सुरेश भंदुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभाग अध्यक्षांमध्ये पंचवटी- अनंता सूर्यवंशी, नाशिकरोड- प्रकाश कोरडे, सिडको- रामदास दातीर, सातपूर- सोपान शहाणे व मध्य नाशिकसाठी अंकुश पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्षपदी वाळू काकड, श्रीराम कोठुळे, सुरेंद्र शेजवळ, संतोष क्षीरसागर, नितीन साळवे, मिलिंद काळे, भाऊसाहेब खेडकर, तुकाराम कोंबडे, गोरख अहेर, किरण खाडम तर सरचिटणीस म्हणून संतोष कोरडे, सत्यम खंडाळे, मन्सूर पटेल, निखिल सरपोतदार, भाऊसाहेब निमसे, नंदू वराडे, प्रवीण भाटे, प्रवीण पवार, योगेश गांगुर्डे, शांताराम चौधरी, अरिंजय नाईक, विजय अहिरे, अँड. अतुल सानप आणि प्रमोद साखरे यांची वर्णी लागली आहे. याशिवाय 29 शहर संघटक आणि 26 शहर चिटणीसही नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासकीय पदांमध्ये कार्यालय अध्यक्ष म्हणून मनोज कोकरे, सचिवपदी मनोज जोशी आणि सचिव संघटक म्हणून पराग शिंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अविनाश अभ्यंकर नाशिकमध्ये तळ ठोकून असून कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन त्यांनी भावना जाणून घेतल्या. त्यानुसार शहर कार्यकारिणीसाठी सुमारे 200 हून अधिक कार्यकर्त्यांची यादी समोर होती परंतु त्याची छाननी होऊन 91 कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले.