इंदिरानगर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची नागरिकांची मागणी
नाशिक/प्रतिनिधी। 10 - राजसारथी सोसायटी परिसरात घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी आणि सोसायटीच्या
संचालक मंडळ आणि सभासदांना समज द्यावी, असे निवेदन नागरिकांनी विभागीय अधिकार्यांना दिले आहे.
राजसारथी सोसायटी परिसरात सुमारे चारशे कुटुंबीय वास्तव्यास असून, सर्वच राज्य सरकारी कर्मचारी आहेत;
परंतु सोसायटीचे संचालक मंडळ स्वच्छता राखत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी कचरा टाकल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या निवेदनावर स्वप्नील जोशी, वैशाली सोनवणे, आयशा शेख, नरेंद्र मराठे, अमित वैद्य आदिंच्या सह्या आहेत.