Breaking News

शहरात गायींना विष देवुन मारण्याचा आघोरी प्रकार


परभणी, 11 -  परभणी शहरामध्ये गायींना वीष देवुन मारण्याची आघोरी परंपरा सुरू झाली असुन यास शासन प्रतिबंध घालणार काय असा प्रश्‍न शहरवासियांसमोर उभा टाकला आहे. 
युती शासनाने सत्तेवर येताच त्यांनी सर्वात महत्वाचा प्रश्‍न गोवंश हत्याबंदी महाराष्ट्रभर लागु केली 
असुन गोवंश हत्या करणार्‍यांना कायद्याने कठोर कारवाई करण्याची तरतुद असल्यामुळे या संदर्भात त्याची कडक अंमलबजावणीही झाली. परंतु काही समाजद्रोह्यांनी आजही खुलेआम गायींना विष देवुन मारण्याचा जणु विडाच उचलला आहे. दिनांक 10 जानेवारी रोजी परभणी शहराच्या विविध भागांमध्ये गायींना विष देवुन मारण्यात आले.यामध्ये खंडोबा बाजार परिसरात सकाळच्या सत्रामध्ये 15 ते 20 गायींना एकाच वेळी विषबाधा झाल्याने त्या दगावल्या.तसेच शहराच्या विविध भागात देखील असाच प्रकार घडला आहे. अशी तक्रार संभाजी सेनेेने केली असुन गुन्हेगारांना पकडुन कडक शासन करण्याचा इशारा दिला आहे अन्यथा या गंभीर प्रश्‍नावर संभाजी सेनेच्या वतीने मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष रामेश्‍वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, जिल्हासंघटक सुधाकर सोळंके, शहराध्यक्ष अरुण पवार तसेच सतिश टाक, रितेश जैन, दौलत शिंदे, गोविंद कदम, नारायण देशमुख, प्रशांत पिंपरकर, अजय मोरे, रामप्रसाद मुळे, नारायण देशमुख, अजय मेटे, व सोनु पवार आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.