Breaking News

छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाणच्या वतीने स्मरणीकेचे विमोचन



परभणी, 11 -  जगाचा पोशिंदा बळिराजा सततची नापिकी, गारपिठ, दुष्काळ यासारख्या संकटांनी हताश होवुन आत्महत्येचा मार्ग स्विकारत असतांना बळिराजाला मानसिक बळ देवुन त्याला आत्महत्येपासुन परावृत्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजे प्रतिष्ठाणच्या वतीने माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाची औचित्य साधुन महाराष्ट्रातील पहिल्या दुष्काळ संघर्ष प्रबोधन यात्रेचे आयेाजन करण्यात आले होते. निमीत्त स्मरणीकेचे विमोचन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार दि. 16 जानेवारी रोजी बी.रघुनाथ. सभागृह परभणी येथे आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश दुधगांवकर, उद्घाटक आ. बाबाजानी दुर्राणी हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे एनसीपीचे राष्ट्रीय महिला अध्यक्षा तथा माजी मंत्री फौजीया खान, आ. विजय भांबळे, आ. मधुसूदन केंद्रे, आ. रामराव वडकुते, आ. विक्रम काळे, जि.प. चे अध्यक्ष राजेशदादा विटेकर, एनसीपी किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे, माजी खा. अ‍ॅड. सुरेश जाधव, अ‍ॅड. बाळासाहेब जामकर, अ‍ॅड. अशोक सोनी, महापौर संगिता वडकर, उपमहापौर भगवानराव वाघमारे, गफार मास्टर अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, विजयराव वाकोडे, प्रा.डॉ. साहेब खंदारे,  डॉ. आसाराम लोमटे, पाथरीचे नगराध्यक्ष जुनेद दुर्राणी, दादासाहेब टेंगसे, डिगांबर कर्‍हाळे, संतोष बोबडे, पुर्णा नगराध्यक्ष विशाल कदम, दिनेश परसावत, अनिलराव नखाते, डॉ. संजय रोडगे, रमाकांत कुलकर्णी, प्रा. अरुणकुमार लेमाडे, नानासाहेब राऊत, चक्रधर उगले, सुभाषदादा जावळे, डॉ. लंगोटे, विनोद कदम यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 
कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. 
विष्णु नवले पाटील, यांच्यासह संदीप मालपणी, सुदर्शन भांबळे, धाराजी भुसारे, राज शेलार, प्रा. सुनिल 
तुरूकमाने, अरुण चवाळ, केशव खटींग, यशवंत मकरंद, हेमंत साळवे, दत्तात्रय सुरवसे, संदीप देशमुख, रामदास अवचार, गोविंद निरवळ, फेरोज खान, राहुल वहिवाळ, विजय कदम, अ‍ॅड. सुजित अबोटी, प्रा. सुरेश कदम, गणेश बोरीकर,  विक्रम काळे, कुणाल गायकवाड आदींनी केले आहे.