जगाशी मैत्री करायची तर आचरणात धम्म असला पाहिजे -प्रा.प्रदिप रोडे
बीड,दि.12 - इतरांचा आदर केला तर आदर्श व्यक्तीमत्व बनते तेव्हा स्वतःचे अस्तित्व विसरून इतरांसाठी जगण्याची धडपड केली पाहिजे जो दुसर्यांची दुःख जाणतो व त्यात सहभागी होते. तोच खरा ज्ञानी ठरतो आणि हेच काम अडिच हजार वर्षापुर्वी तथागत गौतम बुद्धांनी केले. तेव्हा जगाला शांतीचा करूणेचा आणि मैत्रीचा संदेश देणार्या तथागातांच्या धम्माचे आचारण केले तर जगाशी मैत्री करता येईल असा विश्वास बीड जिल्हा मुप्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी व्यक्त केला.
बीड जिल्ह्या मुफ्टाच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.सुरेश वडमारे तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा.प्रदीप रोडे, प्राचार्य गजानन चित्रे, बाबा कांडेकर, प्रविण तरकसे, प्रा.वारभुवन सर व लालासाहेब गायकवाड उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा.प्रदीप रोडे म्हणाले की, आमच्या सन्माचा उचा वाढवण्यासाठी ज्या महापुरूषानी कार्य केले त्या महापुरूषांच्या विचाराचा सन्मान आम्ही केला पाहिजे. आमच्या वागण्यात, बोलण्यात व कृतीत मैत्रीभाव असला पाहिजे. त्यासाठी आम्हाला आमच्यातील मोह, मत्सर, द्वेश,ईर्षा. इ. त्याग करावा लागेल आपण जेवढी आरोग्याची काळजी घेतो तेवढीच काळजी संस्कृती जपण्यासाठीही घेतली पाहिजे तेव्हाच येणारी पिढीही सुसंस्कृत बनु शकते. असे मत व्यक्त केले व महापुरूषांच्या अनेक कार्याची प्रत्येय सांगितली. यावेळी बाबा कांडेकर यांनी आपले मत व्यक्त करता म्हणाले की, काचारीने भिक मागण्याचे वेळ राहिली नाही आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरा प्रमाणे स्वाभिमानी जिवन जगले पाहिजे. त्यांचा आदर्श घेवूनच आपला जिवनप्रवास असला पाहिजे. आले ध्येय व आई-वडीलांची स्वप्नपुर्ण करण्यासाठी महापुरूषांच्या विचाराचा विसर पडून चालणा नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रविण तरकसे यांनी केले तर सुत्रसंचलन अंकुश कोरडे यांनी व आभार प्रा.राम गायवकाड यांनी व्यक्त केले. यावेही अमरसिंह ढाका, प्रा.शरद वंजारे, सदाशिव पटेकर, आप्पाराव जाधव, प्रभु उजगरे, बप्पा जावळे, महेंद्र गायकवाड, बबन वंजारे, नवनाथ गायकवाड, विशाल वक्ते, विश्वंभर बनसोडे, विठ्ठल ससाने आदिसह महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.