डॉ.योगेश क्षीरसागरांच्या हस्तेशौचालय अनुदान पत्र वाटप
बीड,दि.12 - नागरपालिकेच्या वतीने वैयक्तीक शौचालय अनुदानाचे मंजुरी पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
शहरातील इस्लामपुरा भागामध्ये आयोजित अनुदान मंजुरी पत्र वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागातील नगरसेवक जुनेद जहागीरगार, सभापती सय्यद सादेक आली यांनी गरजू व्यक्तीसाठी वैयक्तीक शौचालय मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले. जे कुटूंब या योजनेसाठी पात्र आहेत त्यांचा सर्व्हे करून अनुदान मिळण्यासंबंधी प्रस्ताव दाखल केले होते. या भागातील तब्बल 400 गरजूंना वैयक्तीक शौचालय अनुदान मंजुर झाले असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते वैयक्तीक शौचालय अनुदानाचे मंजुरी पत्र प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. याप्रसंगी हाती महेबुब खान, मौलाना जफर, अमीनुज्जमा, माजेद कुरेशी, आदि उपस्थित होते.