तळेगावात ‘स्त्री जन्माच्या स्वागताची’ मानाची पैठणी कार्यक्रम उत्साहात
तळेगाव (प्रतिनिधी), 18 - तळेगाव परिसरातील युवा उद्योजक राहुल खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्त्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी हा कार्यक्रम 600 महिलांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी या खेळासोबतच स्त्री भ्रूण हत्या या विषयावर प्रबोधन देखील करण्यात आले. तसेच ज्या कुटुंबांनी केवळ मुलींवरच आपला संसार केला. अशा कुटुंबांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात 400 ते 600 महिलांनी सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकास पैठणी आणि सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास 1 भेट वस्तू देण्यात आली. याशिवाय कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात स्टेशन भागातील गुंड्गल यांना प्रथम पारितोषिक मिळाले.