Breaking News

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात पहिल्यांदाच उमलले फूल !


न्यूयॉर्क, 18 - अंतराळ केंद्रात पहिल्यांदाच फूल उमलले आहे. नासानी ट्वीट करुन याबाबतची घोषणा केली आहे. पृथ्वीच्या परिघाबाहेर उगवलेली ही पहिली सजीव वस्तू आहे. या फुलाचे नाव ‘झिनिया’ असे ठेवण्यात आले आहे.
नासाचे अंतराळवीर स्कॉट यांच्या प्रयत्नातून हे फूल उगवले आहे. स्कॉट यांनी अंतराळातून या फुलाचे काही खास फोटोग्राफ शेअर केले आहेत. 60 ते  80 दिवसात हे फूल अंतराळात उगवल्याची माहिती स्कॉट यांनी शेअर केली आहे. ट्विटरवर जारी केलेले हे फूल भारतात उगवणार्‍या सूर्यफुलासारखे दिसते. महत्त्वाचे म्हणजे हे फूल खाण्यायोग्य असल्याचे सांगितले जात आहे. ‘झिनिया’ हे अमेरिकेत सॅलडमध्ये खाल्ले जाते. वैज्ञानिक अनेक दिवसांपासून हा प्रयत्न करत हे याआधीही वैज्ञानिकांनी अंतराळ केंद्रातील व्हेजी लॅबमध्ये लेट्यूस उगवली होती. पृथ्वीच्या परिघाबाहेर घेण्यात आलेल्या या फुलामुळे अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झालेला आहे. येत्या काळात अंतराळात टोमॅटो सारखी पिके सुधा घेता येऊ शकतात असेही स्कॉट यांचे म्हणणे आहे.