राष्ट्रीय युवा दिन व राष्ट्रीय युवा सप्ताह या कार्यक्रमांचे आयोजन
बुलडाणा, 12 - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीतील नेहरू युवा केंद्राच्या बुलडाणा गटाच्यावतीने 12 ते 19 जानेवारी दरम्यान स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन व राष्ट्रीय युवा सप्ताह या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिवस व युवा सप्ताहाचे उद्घाटन, 13 जानेवारीला सांस्कृतिक दिन, 14 जानेवारीला सहभागिता दिन, 15 जानेवारीला सामाजिक सेवा दिन, 16 जानेवारीला शारीरिक सुदृढता दिन, 17 जानेवारीला शांती दिन, 18 जानेवारीला कौशल्य विकास दिन, 19 जानेवारीला जागृती दिन व राष्ट्रीय युवा सप्ताह होईल. जिल्ह्यातील युवा मंडळांनी 12 ते 19 जानेवारीपर्यंत राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन करावे, असे आवाहन केले आहे.