Breaking News

प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदार घ्या ः मैंद

बुलडाणा, 12 - राज्य परिवहन कर्मचार्यांनी निर्व्यसनी राहून सुरक्षित प्रवाशांना सुखकर प्रवासाचा विश्‍वास द्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी 10 जानेवारी रोजी रस्ते सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभप्रसंगी केले. 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बुलडाणा आगारात रस्ते सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिलीप हिवाळे, हरीश ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख, पीएसआय पृथ्वीराजसिंह ठाकूर, विभागीय वाहतूक अधिकारी सुभाष पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक, आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे, स्थानकप्रमुख दीपक साळवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वाहतुक शाखेचे झिने, दीपक वैद्य, अरुण उबरहंडे, चिंचोले, आगासे, नाजीम, युसूफ, राठोड, कव्हळे व बुलडाणा आगारातील बहुसंख्य चालक-वाहक, यांत्रिकी विभाग, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच विविध संघटनांचे कामगार प्रतिनिधी हजर होते. सुत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले. आभार प्रदर्शन आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांनी केले.