नगर पालिकेची विशेष सभा बारगळली
बुलडाणा, 12 - शहरातील जवळपास 1288 लघुव्यवसायीकांचे अतिक्रमण काढण्यात आले. आचार संहिता संपल्यानंतर नगर पालिकेनेही मानवतेच्या दृष्टीकोनातुन अस्थाई स्वरुपात लघुव्यवसायीकांना गाळे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी शहरातील सामाजिक संस्थासुध्दा हातभार लावल्याण्यास तयार आहे. दरम्यान शिवसेनेच्या 12 व भाजपाच्या 1 अशा 13 नगर सेवकांनी अतिक्रमण धारकांच्या मागंण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष सभेची मागणी केली होती. त्यावर आज 11 जानेवारी रोजी सोमवारी सभादेखील आयोजित करण्यात आली होती. मात्र, ज्यांच्या मागणीवरुन सभा आयोजित करण्यात आली. त्याच 13 सदस्यांपैकी तब्बल 10 आणि आणखी 10 असे 20 नगर सेवक अनुपस्थित राहिल्याने गणपुर्ती अभावी सदर सभा रद्द करावी लागली, अशी माहिती नगराध्यक्ष टि.डी. अंभोरे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचीकेवरील निर्णयामुळे अतिक्रमण काढण्यात आली. मात्र, यात बेराजगारांचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. यासंदर्भात आचार संहिता सुरु असल्याने पालिका प्रशासनही काहीच करु शकत नव्हते. त्यातच शिवसेनेच्या संजय गायकवाड, विठ्ठल येवले, हेमंत खेडेकर, सौ.पुजा गायकवाड, गजेंद्र दांदडे, पुनम यादव, राजेश ठोंबरे, सौ.सविता ख्ाुंमकर, सौ.रेखा हेलगे, सौ.गिताबाई राऊत, अर्चना खरात, सौ.रत्नमाला मोरे, सौ.आशा बेगाणी अशा या 13 नगरसेवकांनी नगर पंचायत अधिनियमानुसार विशेष सभा बोलावण्याची मागणी केली होती. यामध्ये टपरी धारकांना कायमस्वरुपी पर्यायी जागा देण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेणे अपेक्षीत होते. असे असतांनाही मागणी केलेल्या 13 पैकी केवळ संजय गायकवाड, सौ.पुजा गायकवाड, सौ.अर्चना खरात या 3 नगर सेवकांसह दादाराव गायकवाड, शे.जाकीर हुसेन कादर, रमेश गायकवाड, उमेश अग्रवाल, अनिता शेळके, गोपीबाई वर्मा आणि आपण स्वत: असे 10 सदस्य उपस्थित असल्याची माहिती टि.डी. अंभोरे यांनी दिली. 20 नगर सेवक अनुपस्थित राहिल्याने गणपुर्ती अभावी ही सभा रद्द करावी लागली. त्यामुळे मागणी कर्त्या आणि अनुपस्थित राहिलेल्या नगर सेवकांची दुटप्पी असल्याचा आरोपही अंभोरे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचेही काही नगर सेवक अनुपस्थित असल्याने याबाबत जिल्हाध्यक्षाच्या कानावर घातल्याचे अंभोरे म्हणाले. महत्वाचे म्हणजे कुठलाही निर्णय हा सभागृहात ठराव रुपात पारित करावा लागतो. मात्र, याच सभागृहात आपणच बोलावलेल्या सभेला अनुपस्थित राहणं संयुक्तीक नसल्याचा खोचक टोला अंभोरे यांनी संबधीतांना हानला.
अतिक्रमण पुन्हा एकदा . . .
शहरातील जवळपास 90 टक्के अतिक्रमण साफ झाले आहे. यात गरिब लघुव्यावसायीकांवरच बुलडोजर फिरविल्याची भावना जनमासांमध्ये वाढत आहे. श्रीमंताच काय असा प्रश्न उपस्थित झाल्यावर अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख राजेश भालेराव यांचेवर शस्त्रक्रिया झाल्याने ते सुटीवर होते. ते आता रुज्ाु झाले असुन पुढील आठवड्यातच पुन्हा अतिक्रमण मोहिम सक्रिय होणार असल्याची माहिती यावेळी, मुख्याधिकारी संजीव ओव्हळ यांनी पत्रकारांना दिली.