Breaking News

अंबडला कामगाराचा खून


 नाशिक/प्रतिनिधी। 12 - अंबड औद्योगिक वसाहतीतील कँपन्यांमध्ये मजुरी करणार्या कामगाराचा धारदार 
शस्त्राने वार करून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह अंबड औद्योगिक वसाहतीतील स्वरूप स्टील या बंद कँपनीमध्ये टाकून दिल्याचा प्रकार रविवारी (दि.10) सायंकाळी उघडकीस आला. मयत कामगाराचे नाव डेबा इसरल पावरा (वय 30, रा. अंबडगाव) असे असून, तो मूळचा धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील गुडकीचा रहिवासी आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील 
स्वरूप स्टील या बंद कँपनीत मजुरी करणार्या एका कामगाराचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. याबाबत त्यांनी अंबड पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची तपासणी करीत असताना खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून तसेच इतर कामगारांनी मयत हा डेबा पावरा असल्याचे सांगितले. अंबड पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मयत पावराच्या 
पश्‍चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार असून, त्याचा खून कोणी व का केला याचा तपास अंबड पोलीस 
ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समीर वाघ करीत आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.